अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाघ जिल्ह्यात आता चांगलाच पेटला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या शाई फेकली या संदर्भात मनपा आयुक्त यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारी आमदार रवी राणा यांच्या सह राजापेठ पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रवी राणा म्हणाले की, मी मागील काही दिवसांपासून दिल्लीतच आहे. आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे शिवप्रेमी चिडले आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र, या सर्व प्रकरणात माझं नाव राजकीय षड्यंयंत्राचा एक भाग आहे.