औरंगाबाद : शासकीय गायरान जमिनी गावातील नागरिकांच्या मालकी हक्काच्या करून दिल्याप्रकरणी सात माजी सरपंच, निवृत्त गटविकास अधिकारी व पाच निवृत्त ग्रामसेवकांना हायकोर्टाने दणका दिला असून, त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सरकारच्या मालकीच्या गावठाण जमिनी नागरिकांच्या मालकीच्या केल्या प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

जालन्यातील टेंभुर्णी गावातील गट क्रमांक १,१९५ व २५९ यांसह गावठाणातील ३२८ एकर जागा सरपंच, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमत करून गावातील एकूण ७०० नागरिकांच्या मालकी हक्काच्या करून दिल्या होत्या. यासाठी सरकारच्या विविध दस्तावेजात बनावट नोंदी करत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड व गाव नमुना नंबर आठमध्ये या ७०० लोकांना सरकारी जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला होता.

ST Strike Update : ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत एसटी संप कायम, हे तर सरकारचे अपयश

या सर्व घोटाळ्याप्रकरणी फकीरचंद खांडेकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. लोकायुक्तांनी संबंधित अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे खांडेकर यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या लोकांवर गुन्हे दाखल…

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार,या प्रकरणात पी. आर. मोरे (रा. टेंभुर्णी), पी. ए. तांबीले (रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलडाणा), पी. पी. तायडे (रा. भडगाव, ता. जि. बुलडाणा), आर. बी. साळवे (रा. वरूड बु., ता. जाफराबाद), ई. एम. थोरात हे निवृत्त ग्रामविकास अधिकारी, जाफ्राबाद पंचायत समितीतील माजी गटविकास अधिकारी जी. एस. सुरडकर, तत्कालीन सरपंच पी. एस. वाघमारे, बद्रुद्दीन कमरोद्दीन सिद्दिकी, संध्या देशमुख, साळूबाई धनवई, संगीता शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि विष्णू जमधडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलासाठी जलसमाधी आंदोलन; नदीच्या पुलावर चढले अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here