या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत महाराष्ट्रावर टीका करत होते तेव्हा राज्यातील भाजप खासदार बाकं वाजवत होते. तेव्हा महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांना लाज वाटली नाही का, असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला. नितीन गडकरी यांच्या घराबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध करणारे भाजप कार्यकर्ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेविरुद्ध उभे आहेत. महाराष्ट्राचा अपमान होऊनही भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत आहेत. याऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत मिळून नितीन गडकरी यांच्याकडे विनंती करायला हवी होती. नितीन गडकरी यांना सांगून पंतप्रधान मोदी यांना माफी मागायला सांगितली पाहिजे होती. ते अधिक सयुक्तिक ठरले असते. त्यामुळे महाराष्ट्रात चांगला संदेश गेला असता, असे अतुल लोंढे यांनी म्हटले.
‘भाजपला वाटतं ते महाराष्ट्राच्या अस्मितेशी कसंही खेळू शकतात’
आपण सतत महाराष्ट्राचा अपमान करु शकतो. राज्याच्या अस्मितेश कसंही खेळू शकतो, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. पण महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस खपवून घेणार नाही. त्यामुळेच आम्ही नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करत आहोत. काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना हिंसा करणार नाहीत, असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.