उत्तर प्रदेशात धार्मिक कारणांमुळे किंवा गरिबीमुळे प्रेतं नदीत सोडली असावीत. संजय राऊत गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांचा मुद्दा उपस्थित करतात. पण त्यांना महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात एकाच सरणावर २४ मृतदेह जाळण्याची वेळ आली, याचा सोयीस्कररित्या विसर पडतो.

जगातील लहान लोकसंख्येच्या ६० देशांइतके करोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले होते. हाच महाराष्ट्राचा खरा अपमान आहे.
हायलाइट्स:
- गेल्या २७ महिन्यांत नवाब मलिक यांच्या जावयला अटक होण्यापासून शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेपर्यंत अनेक प्रकरणं घडली
- पण त्यांनी दाद मागण्यासाठी न्यायालयाचा पर्याच निवडला
चंद्रकांत पाटील हे गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर दिले. गेल्या २७ महिन्यांत नवाब मलिक यांच्या जावयला अटक होण्यापासून शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेपर्यंत अनेक प्रकरणं घडली. पण त्यांनी दाद मागण्यासाठी न्यायालयाचा पर्याच निवडला. पण पहिल्यांदाच आरोप सहन झाले नाही म्हणून किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या हे केंद्रीय यंत्रणांचा उपयोग करतात असे संजय राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण सापडले, हाच महाराष्ट्राचा अपमान: चंद्रकांत पाटील
महाविकासआघाडीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हणतात. पण पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे , जगातील लहान लोकसंख्येच्या ६० देशांइतके करोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले होते. हाच महाराष्ट्राचा खरा अपमान आहे. संजय राऊत गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांचा मुद्दा उपस्थित करतात. पण त्यांना महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात एकाच सरणावर २४ मृतदेह जाळण्याची वेळ आली, याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. उत्तर प्रदेशात धार्मिक कारणांमुळे किंवा गरिबीमुळे प्रेतं नदीत सोडली असावीत. पण करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकार येथील परप्रांतीयांना राज्यातच थांबवण्याचा आत्मविश्वास देऊ शकले नाही. हा महाराष्ट्राच खरा अपमान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bjp chandrakant patil warns shivsena sanjay raut over kirit somaiya attack in pune
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network