न्यूयॉर्क, अमेरिका :

अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘जॉन्सन अँड जॉन्सन‘ कंपनीनं आपल्या कोविड लशीचं काम सध्या स्थगित केलंय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं मंगळवारी दिलेल्या बातमीनुसार, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एका मोठ्या प्लान्टमध्ये लस उत्पादन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, लीडेन या डच शहरात गेल्या वर्षाच्या अखेरीस लसीचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं. या निर्णयात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हवाल्यानं ही बातमी देण्यात आलीय.

दरम्यान, याविषयी कंपनीच्या प्रवक्त्यांनी मात्र बातमीला नकार दिलेला नाही. किंवा या बातमीची पुष्टीही केलेली नाही. मात्र, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आपल्या लस वितरण वचनबद्धतेची पूर्तता करत असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

कंपनीच्या ज्या कारखान्यात सध्या प्रायोगिक लस निर्मितीचं काम सुरू आहे त्याच कारखान्याच येत्या ‘काही’ महिन्यांत पुन्हा एकदा लसीचं उत्पादन सुरू केलं जाईल, असं न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या वृत्तात म्हटलंय.

Omicron: ‘ओमिक्रॉन’ समोर आल्यानंतर जगभरात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मृत्यू
Viral Video: पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ‘तो’ रस्त्यावर फिरत होता
‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडे सध्या कोविड लसीचे लाखो डोस तयार आहेत. आम्ही आफ्रिकन युनियन आणि कोवॅक्स सुविधा यांच्यातील आमच्या कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहू

‘जॉन्सन अँड जॉन्सन’नं २०२२ मध्ये कोविड-१९ लसीच्या ३ अब्ज डॉलर ते ३.५ अब्ज डॉलर विक्रीचा अंदाज वर्तवला आहे. उल्लेखनीय म्हणज, कंपनीचा हा अंदाज याचकालावधीसाठी फायझरनं व्यक्त केलेल्या (३२ अब्ज डॉलरच्या) अंदाजाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर पर्यायी लशींप्रमाणे ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ची कोविड लस अतिशय कमी तापमानात वाहून नेण्याची गरज नाही तसंच या लशीचा एकच डोस (सिंगल-शॉट इनोक्यूलेशन) आवश्यकता असते, त्यामुळे विकसनशील देशांमध्ये कंपनीच्या लसीची मागणी वाढलेली दिसून येतेय.

रशिया-बेलारूसचा युद्धाभ्यास; सीमेवर S-400 आणि सुखोई-35 तैनात
भारतातला ‘हिजाब बंदी’ वाद: मलालानंतर मरियम नवाझ यांनी ‘असा’ नोंदवला निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here