पॅरिस, फ्रान्स :

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या दादागिरीला प्रत्यूत्तर देण्यासाठी इंडोनेशिया फ्रान्सकडून ४२ राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, इंडोनेशिया फ्रान्सकडून भारतापेक्षाही अधिक राफेल विमानांची खरेदी करणार आहे, यावरूनच इंडोनेशियाच्या तयारीचा अंदाज लावता येऊ शकतो.

इंडोनेशिया दौऱ्यावर दाखल झालेले फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे या कराराची माहिती दिली. भारतानंतर आता इंडोनेशियानंही ‘सुपर-डिस्ट्रॉयर’ राफेल जेटची खरेदी केल्यानं नटुना बेटावर कब्जा करू पाहणाऱ्या चीनला चांगलाच दणका बसणार आहे.

इंडोनेशियानं ४२ राफेल लढाऊ विमानांची ऑर्डर दिल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं जात असल्याचं फ्लॉरेन्स यांनी ट्विट केलंय.

राफेल विमान बनवणाऱ्या ‘डसॉल्ट एव्हिएशन‘नं हा करार दीर्घकालीन भागीदारीची केवळ सुरुवात असल्याचं म्हटलंय. यामुळे कंपनीला इंडोनेशियामध्ये दमदार उपस्थिती दर्शवण्याची संधी मिळणार आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांसोबत आपले संबंध मजबूत करण्याची इच्छा असणाऱ्या फ्रान्स आणि इंडोनेशिया यांच्यातील हा करार महत्त्वाचा ठरणार आहे. राफेल विमानांच्या कराराबाबत दोन्ही देशांत दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती. आता केवळ ड्रॅगनच्या युद्धनौकाच नव्हे तर त्यांच्या लढाऊ विमानांनाही दक्षिण चीन समुद्रात धोका वाढणार आहे.

फ्रान्स आणि इंडोनेशिया दरम्यानच्या राफेल कराराचा खुलासा फ्रान्सच्या ‘ला ट्रिब्यून फायनान्शियल’ या वेबसाइटनं सर्वात आधी केला होता. फ्रान्स आणि इंडोनेशिया यांच्यात नुकतेच संरक्षणविषयी संबंध सुरू झालेत. राफेल करारापूर्वी, २०१९ मध्ये इंडोनेशियाच्या हवाई दलासाठी आठ एअरबस हेलिकॉप्टर H225M हेलिकॉप्टरचा सौदा करण्यात आला होता.

Covid Vaccine: ‘या’ कंपनीनं रोखलं कोविड लशीचं उत्पादन!
Omicron: ‘ओमिक्रॉन’ समोर आल्यानंतर जगभरात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मृत्यू
इंडोनेशिया पाणबुड्याही खरेदी करणार?

अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘ओकस करारा’नंतर इंडो-पॅसिफिक प्रदेशात फ्रान्स अधिक रुची घेऊ लागलंय. इंडोनेशियाची पाणबुड्या विकत घेण्याची इच्छा असल्याचे संकेत फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलंय.

चीन आणि इंडोनेशियाचा वाद

दक्षिण चीन समुद्रातील नटुना बेटावरून चीन आणि इंडोनेशिया या दोन देशांत वाद सुरू आहे. सप्टेंबरमध्ये इंडोनेशियानं आपल्या हद्दीत येणाऱ्या समुद्रात दाखल झालेल्या चिनी युद्धनौकेला पिटाळून लावलं होतं. इंडोनेशियानं नटुना बेटावरून चीनचे जहाज हाकललं होतं. हे क्षेत्र इंडोनेशियाच्या ‘एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमी झोन’ अंतर्गत येते. तेव्हापासून चीनकडून इंडोनेशियाच्या अडचणीत वाढ करण्याची सुरूवात केलीय. दक्षिण चीन समुद्रात चीनकडून वाढता धोका लक्षात घेता इंडोनेशिया सातत्यानं आपले सैन्य मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहे.

भारतातला ‘हिजाब बंदी’ वाद: मलालानंतर मरियम नवाझ यांनी ‘असा’ नोंदवला निषेध
Viral Video: पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ‘तो’ रस्त्यावर फिरत होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here