पेशावर, पाकिस्तान :

मुलाच्या हव्यासासाठी काय काय केलं जातं याचं एक धक्कादायक उदाहरण पाकिस्तानच्या पेशावरमध्ये समोर आलंय. ‘मुलगाच होणार‘ असं सांगत एका ढोंगी बाबानं उपचाराच्या नावाखाली एका गर्भवती महिलेच्या डोक्यात तब्बल ५ सेंटीमीटर लांब खिळा ठोकल्याचं समोर आलंय. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबद्दल माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आलीय.

आपल्याकडे दैवी शक्ती असून आपल्याकडे ‘मुलगा’ होण्यासाठी खात्रीशीर इलाज असल्याची बतावणी या ढोंगी पीरनं केली होती. आपण सूफी परंपरेचा पाईक असल्याचंही त्याचं म्हणणं होतं.

पीडित महिला पाकिस्तानच्या वायव्य भागातील रहिवासी असून पेशावर शहरातील रुग्णालयात ती दाखल झाली होती. वेदनेनं कन्हत असलेल्या या महिलेने स्वतः खिळे काढण्याचा प्रयत्न केला परंतु यात तिला यश आलं नाही त्यानंतर तिनं डॉक्टरांकडे धाव घेतली, असं महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर हैदर खान यांनी ‘एएफपी’शी बोलताना म्हटलंय.

पीडित महिला पूर्णपणे शुद्धीत होती, ती प्रचंड वेदनेनं विव्हळत होती. महिलेच्या क्ष-किरण चाचणीत (X-Ray) तिच्या महिलेच्या डोक्यात ५ सेंटीमीटर (२ इंच) खिळा ठोकण्यात आल्याचं दिसत होतं. महिलेचा मेंदू दुखापत होण्यापासून अगदी थोडक्यात बचावला होता. एखाद्या हातोडा किंवा जड वस्तूनं हा खिळा महिलेच्या ठोकण्यात आला होता.

Viral Video: पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ‘तो’ रस्त्यावर फिरत होता
पाकिस्तानात ‘अब्रू’च्या नावावर केवळ सहा महिन्यांत २४०० महिला ‘बेअब्रू’
आपण या अगोदर तीन मुलींना जन्म दिला असून आताही आपल्याला मुलगीच होणार असल्याची माहिती या गर्भवती महिलेनं डॉक्टरांना दिली. यासाठी महिला स्वत:ला अपराधी समजत होती, यासाठीच ती भोंदू बाबाच्या अघोरी उपचारासाठी तयार झाली.

पीरच्या सांगण्यावरून आपण स्वतःच डोक्यावर खिळा ठोकल्याचं अगोदर भेदरलेल्या आणि वेदनेनं कळवळणाऱ्या महिलेनं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. परंतु, नंतर मात्र तिनं पीरनं हे कृत्य केल्याचं सांगितलं. या भोंदू बाबाला पकडण्यासाठी पेशावरचे पोलीस प्रयत्न करत आहेत.

पेशावर शहराचे पोलीस प्रमुख अब्बास एहसान यांनी ‘एएफपी’ला दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतलंय. लवकरच महिलेचा जबाब घेऊन ढोंगी बाबाला पकडण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानात एखाद्या पीरकडे उपचारासाठी जाणं ही सर्वसामान्य गोष्ट म्हणून गणली जाते. तसंच दक्षिण आशियात एखाद्या मुलीपेक्षी मुलाला जन्म देणं याकडे ‘आर्थिक सुरक्षेची गॅरंटी‘ म्हणून पाहिलं जातं.

भारतातला ‘हिजाब बंदी’ वाद: मलालानंतर मरियम नवाझ यांनी ‘असा’ नोंदवला निषेध
कर्नाटक हिजाब वाद : मुस्लिमांच्या दडपशाहीचा कट, पाकिस्तानकडून आगीत तेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here