सुमित कुमार बजाजच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अनेकांनी त्यांचे आभारही मानले आहेत. धोनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपला बहुतांश वेळ जेएससीए (JSCA) स्टेडियममध्येच घालवतो. धोनी स्टेडियममध्ये फलंदाजीच्या सरावासह टेनिस, फुटबॉलही खेळतो. तो जिममध्येही घाम गाळतो, तसेच पोहण्याचाही आनंद घेतो. धोनी त्याची फ्रँचायझी असलेल्या सीएसकेच्या काही सदस्यांसह मेगा लिलावाची तयारी करण्यासाठी गेल्या आठवड्यात चेन्नईत गेला होता. आता तो त्याच्या मूळ गावी रांचीला परतला आहे.
सुमीत कुमार बजाजने याआधीही धोनीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील काही व्हिडिओमध्ये कॅप्टन कूल टेनिसमध्ये हात आजमावताना दिसत आहे. धोनीने बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला. धोनीच्या त्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही, हेच यावरून दिसून आले. काही लोकांनी सुमीत कुमार बजाज यांच्याकडे धोनीचा ऑटोग्राफ घेण्याची मागणीही केली होती.
आयपीएलचा लिलाल १२ आणि १३ फेब्रुवारी या कालावधीत बंगळुरु येथे होणार आहे. या लिलावात चेन्नईचा संघ कोणाला संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धोनी या आयपीएलमध्ये खेळणार की नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण लिलावापूर्वी संघाने धोनीला रिटेन केले असले तरी त्याच्यापेक्षा जास्त पैसे हे रवींद्र जडेजाला देण्यात आले आहेत.