चीनमध्ये करोना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची चर्चा होती व तशी शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, चीनमध्ये करोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आले असल्याची माहिती डॉ. झोंग नानशान यांनी दिली. करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी चीन सरकारने डॉ. झोंग यांना नियुक्त केले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, करोनाचा संसर्ग वेगाने होत असून यामध्ये रुग्णाचे प्राणही जातात. त्यामुळे करोनाच्या नियंत्रणासाठी दोनच पर्याय आहेत. करोना संसर्गाचा दर कमी करणे आणि त्याचा फैलाव होण्यापासून अटकाव करणे. जेणेकरून बचावासाठी अधिक वेळ मिळू शकतो, असेही त्यांनी म्हटले. तर, दुसऱ्या पर्यायात काही उपाययोजना आखून करोना रुग्णांची संख्या कमी करणे आणि संसर्गाच्या फैलावास अधिकाधिक उशीर करणे हेच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
जगातील बहुतांशी देशांनी करोनाच्या नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे आता एप्रिल अखेरपर्यंत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आगामी काही आठवडे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. चीनमध्ये पुन्हा करोनाचा फैलाव होणार असल्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times