वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा एका नव्या वादात अडकलेत. ट्रम्प यांनी पदावर विराजमान असताना काही महत्त्वाची कागदपत्रं फाडून शौचालयात फ्लश केल्याचा आरोप करण्यात येतोय. अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस‘चं टॉयलेट तुंबल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्षांचं हे कृत्य समोर आलं होतं.

या आरोपानंतर कागदपत्रांच्या संरक्षणासंबंधी कायद्यांच्या कथित उल्लंघनाची एक लांबलचक यादीच तयार झालीय. मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावर असताना अनेकदा प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केलं होतं. गेल्या आठवड्यात, ‘नॅशनल आर्काइव्हज‘नं वृत्ताची पुष्टी करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदपत्रं फाडून फ्लश केल्यानं शौचालय तुंबल्याचं सांगितलं.

ट्रम्प यांच्या कृत्याची चौकशी होणार?

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नॅशनल आर्काइव्हजनं अमेरिकेच्या न्याय विभागाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसची कागदपत्रं फाडण्याच्या सवयीची आणि कृतीची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

ट्रम्प यांच्यावर याआधीही राष्ट्राध्यक्ष पदावर असूनही शिष्टाचारांतर्गत स्वीकारण्यात आलेल्या अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, यावेळी प्रकरण थोडं वेगळं आहे. राष्ट्रपतींशी संबंधित नोंदी जतन करणाऱ्या ‘नॅशनल आर्काइव्ह’शी हे प्रकरण संबंधित आहे.

चीनच्या दादागिरीला प्रत्यूत्तर; इंडोनेशिया फ्रान्सकडून ४२ राफेल जेट खरेदी करणार
रशिया-बेलारूसचा युद्धाभ्यास; सीमेवर S-400 आणि सुखोई-35 तैनात
उत्तर कोरियाच्या हुकूमशहासोबत पत्रव्यवहार

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सोमवारी ‘गव्हर्नमेंट रेकॉर्डस ऑफीस’नं ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इस्टेटमधून कागदपत्रांचे १५ बॉक्स जप्त करण्यात आल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाल्यानंतर वॉशिंग्टन सोडताना हे बॉक्स ट्रम्प यांनी आपल्यासोबत नेले होते. उल्लेखनीय म्हणजे, या कागदपत्रांत उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी झालेल्या अधिकृत पत्रव्यवहारांचाही समावेश आहे.

गेल्या आठवड्यात, ‘आर्काइव्ह’नं वृत्ताची पुष्टी करताना ट्रम्प यांनी कागदपत्रे फाडली होती. मात्र त्यापैंकी काही कागदपत्रं टेपच्या साहाय्यानं पुन्हा जोडण्यात आली होती असा खुलासा केला होता.

‘वॉटरगेट’ घोटाळ्यानंतर संमत करण्यात आलेल्या १९७८ च्या ‘प्रेसिडेन्शिअल रेकॉर्ड ऍक्ट’ (PRA) नुसार, यूएस राष्ट्राध्यक्षांनी सर्व ईमेल, पत्रं आणि व्यावसायिक दस्तऐवज राष्ट्रीय अभिलेखागाराकडे हस्तांतरित करणं आवश्यक आहे.

Covid Vaccine: ‘या’ कंपनीनं रोखलं कोविड लशीचं उत्पादन!
Omicron: ‘ओमिक्रॉन’ समोर आल्यानंतर जगभरात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मृत्यू

ट्रम्प यांनी आरोप नाकारले
दुसरीकडे, ट्रम्प यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आर्काइव्हसोबतचा आपला व्यवहार ‘अत्यंत मैत्रीपूर्ण असून आमच्यात कोणताही वाद नाही’. मीडियात ज्या प्रकारे नॅशनल अर्काइव्हशी माझं नातं रंगवलं जातं ते अतिरंजक पद्धतीनं सादर केले जातात, असं स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिलंय.

मात्र, Axios या बेवसाईटनं एक वृत्त प्रसारित केलं. यामध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळावर लिहिलेल्या पुस्तकात कागदपत्रं व्हाईट हाऊसच्या टॉयलेटमध्ये फ्लश करण्याचा प्रयत्नात टॉयलेट तुंबल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलंय. यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रकरणाला एक नवा ट्विस्ट मिळाला.

Bus Accident: ३०० फूट खोल दरीत कोसळली बस, २० जणांचा जागीच मृत्यू
मुलाच्या हव्यासापोटी… ढोंगी बाबानं गर्भवती महिलेच्या डोक्यात ठोकला खिळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here