टोरंटो, कॅनडा :

करोनाविरुद्धच्या लढ्यात वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या लशींचा वापर केला जात असला तरी अद्याप करोना मूळापासून नष्ट करणारा उपाय सापडलेला नाही. यावर अनेक तज्ज्ञ काम करत आहेत. याच दरम्यान कॅनडातील ‘मॅकमास्टर युनिव्हर्सिटी‘च्या शास्त्रज्ञांनी नाकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या अँटी-कोविड-१९ लस विकसित केलीय. नाकाद्वारे घेतली जाणारी ही लस सर्व प्रकारच्या विषाणूंपासून व्यापक, दीर्घकालीन संरक्षण प्रदान करू शकते, असा करण्यात आलाय. चाचणी दरम्यान केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केलाय.

श्वसननलिकेतून घेतल्या जाणाऱ्या लसीचे अनेक फायदे एका अभ्यासात नमूद करण्यात आलेत. ‘सेल’ या संशोधन जर्नलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित करण्यात आलाय.

यानुसार, पारंपरिक ‘इंजेक्शन’ऐवजी थेट श्वसननलिकेतून घेतल्या जाणाऱ्या लसीचे अनेक फायदे होतात. नाकाद्वारे घेतली जाणारी लस नाकातून थेट फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये पोहोचते, जिथून श्वासाद्वारे विषाणू शरीरात प्रवेश करतो.

Omicron: ‘ओमिक्रॉन’ समोर आल्यानंतर जगभरात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मृत्यू
Covid Vaccine: ‘या’ कंपनीनं रोखलं कोविड लशीचं उत्पादन!
प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. ‘इनहेल्ड एरोसोल’ लसींचं सध्या निरोगी प्रौढांवर अभ्यास केला जात आहे. ज्या व्यक्तींनी अगोदर कोविड १९ mRNA लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांना अभ्यासात सहभागी करून घेण्यात आलंय.

क्षयरोगाच्या लसीसाठी संशोधन कार्यक्रमावर धोरण आखणारे झोउ जिंग हे या अभ्यासाचे सह-प्रमुख आणि लेखक आहेत.

इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसींपेक्षा श्वसनाद्वारे दिली जाणारी लस अधिक उपयोगी ठरते असं आम्ही अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ठामपणे सांगू शकतो, असं ‘मॅकमास्टर युनिव्हर्सिटी’चे प्रोफेसर जिंग यांनी म्हटलंय.

Donald Trump: कागदपत्रं फ्लश केल्यानं ‘व्हाईट हाऊस’चं टॉयलेट तुंबलं; ट्रम्प यांच्यावरच्या आरोपांना नवा ट्विस्ट
Bus Accident: ३०० फूट खोल दरीत कोसळली बस, २० जणांचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here