जळगाव : शहर मनपातील भाजपच्या ४ नगरसेवकांनी आज शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाळधी येथे शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी या नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मिनाक्षी पाटील, मीना सपकाळे अशी पक्षांतर केलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. (Jalgaon Shivsena Vs Bjp Latest News)

भाजपच्या २८ नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. जळगाव मनपात गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या उड्या सुरूच असून नागरिक संभ्रमात आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.

पुण्यातील ‘या’ भागात रिक्षाचालकांनी अचानक पुकारला बंद; प्रवाशांचा संताप!

शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती. भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी सभागृह नेते ललित कोल्हे हे प्रयत्नशील होते. बंडखोर नगरसेवकांच्या ते कायम संपर्कात होते. अखेर ललित कोल्हे यांची खेळी यशस्वी झाली असून चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.

शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मिनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधलं आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, अ‍ॅड.दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, कुंदन काळे, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here