प्राथमिक माहितीनुसार, देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेम प्रकरणातून ही घटना घडली. लोहणेर येथील तरुण-तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र या प्रेम प्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे कुटुंबातील लोक मुलीचे दुसरीकडे लग्न जमवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रेमात असलेल्या तरुणामुळे या मुलीचे लग्नच जमत नव्हते. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी थेट सदर तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत तरुण गंभीररीत्या भाजला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सदर युवक ५५ टक्के भाजला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेची परिसरात मोठी चर्चा होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.