पुणे : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ला प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जबाब नोंदवला आहे. मात्र, पोलिसांनी २ तास बसवून फक्त जबाब नोंदवला, हल्लेखोरांविरुद्ध माझ्या तक्रारीनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya On Shivsena)

कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची झाल्याची तक्रार देण्यासाठी सोमय्या ५ फेब्रुवारीला पुणे महापालिकेत आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर कोसळून ते जखमी झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक केली होती. स्वतः च्या तक्रारीनुसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या शुक्रवारी रात्री आले होते. मात्र, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पहिल्याच गुन्ह्यात सोमय्या यांचा जबाब नोंदवला.

Rahul Gandhi: गोव्यात भाजपने काँग्रेसचा जनादेश चोरला!; राहुल गांधी यांचे PM मोदींना प्रत्युत्तर

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले आहे की, पोलिसांनी २ तास बसवून फक्त जबाब नोंदवला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर राज्य सरकारचा दबाब आहे. माझ्यासोबत असलेल्या कमांडोवर हल्ला झाला आहे, मात्र त्यांचीही तक्रार न घेता गुन्हा दाखल केला नाही. आम्ही सर्व पुरावे देऊनही कठोर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पोलीस आयुक्त व स्थानिक पोलिसांवर ठाकरे सरकारचा दबाव आहे,’ असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

‘हल्ला करणार्‍या ६४ जणांवर कारवाई करा’

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मी आरोप केले. त्यातील सत्य उघड होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. हात पाय तोडा पण किरीटला गप्प बसवा,” असा आदेश ठाकरेंनी दिला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. दरम्यान, गेल्या आठवड्यात माझ्यावर हल्ला करणार्‍या ६४ जणांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here