औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर काम करणे गरजेचे आहे. पक्ष मजबुतीसाठी कामाला लागा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मेळाव्यात केले.

वंचित बहुजन आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा शुक्रवारी दुपारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात पार पडला. या मेळाव्यात राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे आणि मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. या जिल्हास्तरीय मेळाव्यात गट आणि गण कार्यकारिणी गठीत करण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. नवीन पदाधिकाऱ्यांचा आणि पक्षप्रवेश करणारे ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्याम भारसाकळे यांनी सूत्रसंचालन केले आणि पी. के. दाभाडे यांनी आभार मानले.

अग्निशमन दलात आग विझवणारा यंत्रमानव दाखल, पण…
मेळाव्याला जिल्हाध्यक्ष योगेश बन, सागरदास मोरे, भाऊराव गवई, कचरू मेंगाळे, प्रा. अब्दुल समद, अ‍ॅड. रामेश्वर तायडे, अशोक शेजवळ, मिलिंद बोर्डे, रूपचंद गाडेकर, बाबा पटेल, परमेश्वर ठोंबरे, सुभाष कांबळे, प्रदीप धनेधर, समाधान वाघमारे यांच्यासह पश्चिम जिल्ह्याअंतर्गत गंगापूर, खुलताबाद, कन्नड आणि औरंगाबाद तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा जिल्हास्तरीय मेळावा शुक्रवारी झाला.

अनिल देशमुख यांचा आणखी एक घोटाळा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here