गोंदिया : फुलचूर येथील हॉटेल एव्हरग्रीनमध्ये विष प्राशन करून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश (वय २२), रा. गोंदिया व रोहिणी (वय २१), रा. नागपूर या दोघांचे प्रेमसंबंध होते. अशातच गोविंदपूर येथील मावशीच्या घरी लग्न असल्यामुळे रोहिणी ही गुरुवारी नागपूर येथून आली होती. दुपारच्या सुमारास ती घरून निघून गेली. आकाशसोबत भेटली. दोघांनीही रात्री फुलचूर येथील हॉटेल एव्हरग्रीन गाठले.

अग्निशमन दलात आग विझवणारा यंत्रमानव दाखल, पण…
विष घेण्यापूर्वी आकाशने आपल्या आईला आपण हॉटेलवर असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या आईने हॉटेल गाठत वेटरच्या मदतीने रूममध्ये जाऊन बघितले असता आकाश आणि रोहिणी हे दोघेही बेशुद्धावस्थेत दिसले. विष घेतल्याचे लक्षात येताच दोघांनाही केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मलेवार करीत आहेत.

अनिल देशमुख यांचा आणखी एक घोटाळा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here