औरंगाबाद : गेल्या महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यात अनेक भागातील तापमानाचा पारा १० अंशांपेक्षा खाली घसरला होता. त्यामुळे थंडीची जाणीव अधिक होत होती. मात्र आता मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत किमान तापमानात व कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता, असल्याने उन्हाच्या झळा सोसावा लागणार आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राच्या व्यक्त करण्यात आली.

मोसम सेवा केंद्राच्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमान हळूहळू घटण्याची शक्यता आहे. तर सॅक, इस्रो यांच्या माहितीनुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, असे सांगण्यात आले आहे.

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर असताना आईला फोन करून बोलावलं, रुममध्ये पोहोचताच सगळे हादरले
हा आठवडा थंडीचा

पुढील तीन दिवस थंडी नसणार असली तरीही, विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली आहे. त्यामुळे ‘कभी गर्मी कभी थंडी’ आशा मौसमाचा सामना करावा लागणार आहे.

रुग्ण वाढण्याची शक्यता

पुढील तीन दिवसांत किमान तापमानात व कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता, थंडी कमी होणार आहे. तर त्यानंतर १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा तळ थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामानातील या बदलामुळे सर्दी, खोकला या सारख्या आजारात वाढ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन काँग्रेस केंद्रीय मंत्र्याच्या घरावर ‘धिक्कार मोर्चा’ काढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here