कोकणातील रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात आंबडवे गावी आज, शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. आंबडवे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्याला छावणीचे स्वरूप आलेले आहे. तालुक्यातील प्रमुख पाच मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

राष्ट्रपतींचा दौरा; मंडणगड तालुक्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था; या ५ मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद

हायलाइट्स:

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात येणार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे भेट देणार
  • मंडणगड तालुक्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात
  • तालुक्यातील प्रमुख पाच मार्गांवरील वाहतूक राहणार बंद
रत्नागिरी: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कोकणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे आज येणार आहेत. यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील प्रमुख पाच मार्गांवरील वाहतूक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिली. राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मंडणगडमध्ये पोहोचणार आहेत.

मंडणगड म्हाप्रळ चेक पोस्टकडून शेनाळे मार्गे मंडणगड शहरांमध्ये प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक शेनाळे फाट्यापासून बंद राहील. खेड दापोलीकडून मंडणगड शहरांमध्ये दापोली फाटा मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटा मार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाटापर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. बाणकोटकडून पाचरळ फाटा म्हाप्रळ शेनाळेफाटा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळकडून पेवे पंदेरी मार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अशा प्रकारे पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल, सुरक्षेसाठी ही वाहतूक काही काळ बंद राहील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या मूळ गावी राष्ट्रपती देणार भेट

म्हाप्रळकडून खेड दापोली बाणकोटकडे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा येथून कुंबळे मार्गे जाईल. खेड दापोली कडून महाडकडे जाणारी वाहतूक कुंबळे शेनाळे फाटा मार्गे वळविण्यात येत आहे. बाणकोटकडून मंडणगड मार्गे महाडकडे जाणारी वाहतूक देव्हारे, दापोली, कुंबळे शेनाळे फाटा मार्गे जाईल. म्हाप्रळकडून बाणकोटकडे मंडणगड मार्गे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा, कुंबळे दापोली देव्हारे मार्गे बाणकोटकडे जाईल. आत्तापर्यंत मंडणगड तालुकावासियांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले आहे. शनिवारी कोणत्याही प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुकावासियांनी आपले योगदान देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले.

कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; धोकादायक खांबामुळे आंबेत-म्हाप्रळ पूल वाहतूकीसाठी बंद
Chiplun Landslide : चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली जेसीबी अडकला, दोघे जण दबल्याची भीती

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ratnagiri president ramnath kovind visit today at ambadave in mandangad security tightened
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here