औरंगाबाद : देशातील वाढत्या करोनाला महाराष्ट्रातील काँग्रेस जवाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यांच्या याच विधानाला विरोध करण्यासाठी आज काँग्रेसकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या घरावर काँग्रेसकडून मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. तर आता काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर आता कराड यांच्या घराला आम्ही संरक्षण देणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये आज काँग्रेस-भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

मोदींच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलने केले जात आहे. तर उद्या ( शनिवारी ) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर काँग्रेसकडून धिक्कार मोर्चे काढले जाणार आहे. त्याचप्रमाणे अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी सुद्धा औरंगाबाद काँग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे औरंगाबाद प्रभारी मुजाहेद खान आणि जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली होती.

Weather Alert : उन्हाच्या झळा सोसायला तयार रहा, पुढच्या ३ दिवसांत हवामान खात्याकडून इशारा
यानंतर भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, मोदींच्या भाषणाच्या विरोधात काँग्रेस पार्टी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा व निदर्शने करणार आहे. त्यामुळे कराड यांच्या घराच्या संरक्षणार्थ सर्व प्रदेश व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती, भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस-भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन काँग्रेस केंद्रीय मंत्र्याच्या घरावर ‘धिक्कार मोर्चा’ काढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here