औरंगाबाद : करमाड परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यावर एका युगुलाने आधी विष प्राशन केले. त्यानंतर एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला. तर दोघे मृत युगुल नात्याने दीर, भावजय असून काकासाहेब बबन कदम (वय ३२) व सत्यभामा अशोक कदम (२७) अशी मृतांची नावे आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही वेळातच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि खाली कोसळले. वांत्या करत ते रस्त्यावर हातपाय खोडत तडफडत होते. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला.

भाजीपाला शहरात येणं बंद होणार, ‘या’ कारणामुळे ट्रान्स्पोर्टर्सची चाकं थांबली
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघांना १०८ रुग्णवाहिकेतून चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. तर सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

बहिणीसह बेपत्ता होत्या…

सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्या असल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली आहे. तर बहिणीचा शोध लावण्यात करमाड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी यश आले होते. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचाही शोध घेत होते.

Weather Alert : उन्हाच्या झळा सोसायला तयार रहा, पुढच्या ३ दिवसांत हवामान खात्याकडून इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here