हिंगोली : मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा आणि कळमनुरी हे तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. कारण, या परिसरातील जमीन काळी कसदार व चांगल्या प्रतीची आहे. विशेषता पाहिजे त्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर पाणी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे केळीची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी नेहमी उत्साही असतात.
वसमत विभागाची केळी तेलंगाना, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, नागपूरसह अदी विभागात जाते. सध्या केळीच्या बागा कमी झाल्या असल्याने केळीस मागणीसुद्धा वाढली आहे. काही दिवसातच भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज घडलीला १००० ते १२०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. यामध्ये आणखी दर वाढतील अशी शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
मध्यंतरी राज्यातील करोनाची रूग्ण संख्या वाढत चालली होती. त्यामुळे पवार यांनी शेतकऱ्यांच्या केळी बागांकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता तेच व्यापारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बागान भोवती घिरट्या घालू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार का? हे पहावे लागणार आहे. गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर असताना आईला फोन करून बोलावलं, रुममध्ये पोहोचताच सगळे हादरले