जालना : जालन्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेतात सरपण, काड्या वेचण्यासाठी गेलेल्या वहिनीला ज्वारीच्या शेतात ओढत नेऊन चुलत दिरानेच बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला आपल्या शेतात सरपण, काड्या वेचण्यासाठी गेली असता तिच्या चुलत दिराने ज्वारीच्या शेतातून लपत येऊन महिलेला शेतात ओढत नेऊन बळजबरी करत बलात्कार केला.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात काम करणाऱ्या महिलेच्या पतीने धाव घेतली व आपल्या पत्नीला चुलत भावाच्या तावडीतून सोडून जाब विचारला असता आरोपीनेच उलट या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला.

MSRTC Strike : एसटी कर्मचारी संपाचा तिढा सुटणार? ‘तो’ अहवाल हायकोर्टात सादर
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके, उपपोलिस निरीक्षक अंकुश पडोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक करत महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बळजबरी करून बलात्कार केल्या प्रकरणी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आता नात्यांवर विश्वास राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.

धक्कादायक! आधी विष घेतलं, त्यानंतर एकमेकांना मिठी मारली आणि त्याच अवस्थेत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here