राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यांवर जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. वानखेडे हे मुस्लिम होते आणि ते अनुसूचित जातीचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. समीर वानखेडे यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते आणि त्यातून त्यांनी नोकरी मिळवली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. वानखेडे हे मुस्लिम असून, त्यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच आपल्या ट्विटर हँडलवरून जातीचा दाखला पोस्ट करून तो समीर वानखेडे यांना मूळ जन्मदाखला होता असे सांगितलं होतं. मलिक यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दोन ट्वीट केले होते. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर पहचान कौन? अशी कॅप्शन टाकली होती. तर अन्य एका ट्वीटमध्ये त्यांनी महापालिकेचे एक प्रमाणपत्र पोस्ट केले होते. मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना, ज्ञानदेव वानखेडे यांनी आपण कधीही धर्म बदलला नाही. मलिक यांचे आरोप खोटे आहेत, असं सांगितलं होतं.