नामदेव पतंगे हे हिंगोली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष आहेत. झालेल्या सर्व प्रकाराबद्दल त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार सुद्धा केली आहे. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाशी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी असे म्हटले आहे की तुम्ही कुणाला मोबाईल नंबर दिला असेल किंवा चुकून कोणी तुमचा नंबर दिला असेल तर मेसेज येऊ शकतो असं आरोग्य विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, असं असलं तरी मात्र पतंगे यांनी स्वतः लसीचा दुसरा डोस घेतला असा त्यांच्या नावानिशी सदेश प्राप्त झाला आहे. यामुळे या प्रकाराबाबत अधिक चौकशी प्रशासनाने करावी अशी मागणी नामदेव पतंगे यांनी केली आहे.