माणगाव: रायगड जिल्ह्यातील (Raigad) माणगाव शहरात (Mangaon) आज, मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी थरारक घटना घडली. शहरातील कचेरी रोड मार्गावर काळ्या रगांच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी मेडिकल दुकान बंद करून पायी जाणाऱ्या तरुणावर पिस्तुलानं गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघे हल्लेखोर दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापूरच्या दिशेने पळून गेले.

गोळीबारात तरूण जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद दीपक रामकिशोर यादव (वय २४, रा. सुखादेवी इमारत, कचेरी रोड, माणगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने माणगाव शहरासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून भरवस्तीत अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती समजताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

30 dogs found dead: धक्कादायक! ३० श्वानांचे मृतदेह आढळले; विषप्रयोग केल्याचा अंदाज
बापरे! गेटवे-मांडवा बोटीतील प्रवासी बॅगसकट समुद्रात पडला अन्….

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी दीपक रामकिशोर यादव व जखमी तरूण शुभम ग्यानचंद जैस्वाल (वय २४, रा. सुखादेवी इमारत, कचेरी रोड, माणगाव) हे मेडिकलचे दुकान बंद करून कचेरी रोड येथून घरी पायी जात होते. त्यावेळी शारदा स्वीट मार्टच्या समोर ते आले असता समोरून कचेरी रोड येथून एक काळ्या रंगाची दुचाकी आली. त्यावरील दोघांनी इदांपूरला जाणारा रस्ता कोठे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा शुभम हा त्यांना रस्ता सांगत असताना, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्याजवळील पिस्तुलाने शुभमच्या पोटावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर ते दोघे हल्लेखोर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाने इंदापूरच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यामागील कारण समजले नसून, माणगाव पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

धक्कादायक! सरपंचानं मागितली होती लाच, पोलिसांनी सापळा रचला अन्…

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे व माणगावचे पोलीस निरीक्षक आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेग करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here