मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सन १९८९ ते २०२१पर्यंत म्हणजे गेल्या सुमारे ३२ वर्षांत तब्बल ९३८.८७ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे, असा रस्तेकामांचा लेखाजोखा महापालिकेने स्थायी समितीला दिला आहे. म्हणजे पालिकेच्या अखत्यारीतील मुंबईतील एकूण २,०५५ किमी रस्त्यांपैकी सुमारे ५० टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. सन २०२०-२१ व २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात १६३.५७ किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले, तर २०२२-२३ मध्ये २२६.७२ किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईत आजतागायत किती किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले? सन २०२१मध्ये मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांपैकी किती सिमेंट काँक्रीट रस्ते पूर्ण करण्यात आले? किती रस्त्यांचे काम शिल्लक आहे? तसेच किती रस्ते पुन्हा सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत? रस्त्यांची डांबरीकरणाद्वारे सुधारणा का करण्यात येत नाही? खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे? यासाठी कोणते तंत्रज्ञान फायद्याचे ठरले? याबाबतची माहिती स्थायी समितीने रस्ते विभागाकडे मागितली होती. याबाबतचा अभिप्राय रस्ते विभागाने स्थायी समितीत सादर केला आहे.

खड्ड्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पालिकेने सतत खराब होणाऱ्या डांबरी रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान पडणारे खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. हे तंत्रज्ञान फायदेशीर व यशस्वी ठरत असल्याचा दावा अभिप्रायात करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढणे काँग्रेस नेत्यांना पडलं महागात; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सरकारी रस्त्यांची सुधारणा पालिका करणार

रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांवरून पालिकेला लक्ष केले जाते. हे खड्डे कोणत्याही सरकारी यंत्रणांचे असले तरी तेथील कामे यापुढे पालिकाच करणार आहे. याबाबत नवीन धोरण अंमलात आले असून त्यानुसार म्हाडा प्राधिकरण व अन्य शासकीय रस्त्यांची सुधारणा आणि दुरुस्ती, देखभाल पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे रस्ते विभागाने स्पष्ट केले आहे.

पाणी मुरणार कसे?

कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुर्दशा तसेच खड्ड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पालिकेने सहा मीटर रुंदीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत दरवर्षी शंभर किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. काँक्रिटीकरणाच्या या वेगात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

Honey Singh: हनी सिंग नागपुरात? पोलीस आज आवाजाचे नमुने घेण्याची शक्यता; ‘तो’ प्रकार भोवला!

खड्डे का पडतात?

– कमी वेळात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस

– मुंबईची भौगोलिक स्थिती, जमिनीखालील पाण्याची उच्चस्तर पातळी

– रस्यांवरील वाहनांची वर्दळ व घनता

– रस्त्याशेजारी झोपडपट्ट्या व दुकानदारांचे अतिक्रमण

– उपयोगिता सेवा कंपन्यांमार्फत वारंवार होणारे खोदकाम

– डांबराच्या भौतिक गुणधर्मानुसार पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा संपर्क

‘करोनाच्या भयावह काळात आम्ही मदतीसाठी पुढे सरसावलो; आता सोमय्या आमच्यावर वाट्टेल ते आरोप करतायत’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here