पालघर: पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका ४८ वर्षीय व्यक्तीने गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित तरूणीने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी पोलिसांनी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील एका गावात तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. पीडिता ही गतिमंद असल्याची माहिती मिळते. तिने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. शनिवारी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai: मुंबईतील धारावीमध्ये रिक्षाचालकावर गोळीबार, गंभीर जखमी
Raigad News : मेडिकल बंद करून तरूण रस्त्याने निघाला होता, तितक्यात…; मध्यरात्री थरार

पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रमगडमध्ये ही घटना घडली. पीडिता ही गतिमंद आहे. तिच्याच गावातील आरोपी हा मागील ५ महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत आपल्या आईला सांगितले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी हा पीडितेला धमकी द्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा, अशी माहितीही मनोर पोलिसांनी दिली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बलात्कार आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एसटीतही ‘केबिन कमाई’! प्रवाशांना तिकीट न देता पैसे घेण्याचा प्रकार, दंडात्मक कारवाईच्या सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here