औरंगाबाद : पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आणि पाणीपुरवठ्यात समानता आणण्यासाठी औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीतर्फे प्रत्येक नळाला मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पहिल्या टप्प्यात ५ हजार व्यावसायिक नळांना अत्याधुनिक अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसविले जाणार असून, यासाठी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी १३ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे.

औरंगाबाद शहराला स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे विकास काम केली जात आहे. पण असे असताना औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न खूपच बिकट बनला आहे. जायकवाडी धरण तुडुंब भरलेलं असताना सुद्धा शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. त्यामुळे आता स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण यासाठी प्रत्येक नळाला मीटर बंधनकारक पाहिजे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचेही मत आहे. त्यामुळे आता महापालिका, स्मार्ट सिटीकडून नळांना अत्याधुनिक अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Mumbai: मुंबईतील धारावीमध्ये रिक्षाचालकावर गोळीबार, गंभीर जखमी
मीटरमुळे काय होणार?

सुरवातीला पहिल्या टप्प्यात ५ हजार व्यावसायिक नळांना अत्याधुनिक अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसविले जाणार आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह, पुरवठा आणि वापर यांची माहिती प्रशासनाकडे आपोआप येईल. शिवाय एकाच ठिकाणाहून याची नोंद घेणे शक्य होईल. स्मार्ट सिटीच्या ऑपरेशन कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटर येथून त्याचे निरीक्षण करण्यात येईल. जेवढे पाणी ग्राहक वापरतील, तेवढेच पैसे त्यांना द्यावे लागतील. यामुळे पाणीपुरवठ्यात समानता येईल आणि पाण्यावरील अतिरिक्त खर्चही वाचेल.

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here