औरंगाबाद न्यूज लाइव्ह: आमदार चहा पिण्यासाठी आले अन् सेनेच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीत गेलं, पुढं घडलं भलतंच – aurangabad news mla came for tea and took the shiv sena corporator to the ncp
औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे.स्थानिक नेतेमंडळी आज या पक्षात तर, उद्या त्या पक्षात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्येही असेच काही चित्र असून, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी सत्तेत सोबत असलेल्या पक्षातील स्थानिक नेत्यांना फोडण्याचा धडाकाच लावला आहे. त्यातच शनिवारी पुन्हा एकदा गंगापूर येथील एका शिवसेनेच्या नगरसेवकाच्या घरी चहा-पाण्यासाठी गलेल्या चव्हाण यांनी नगरसेविकासहित पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला.
गंगापूर दौऱ्यावर असताना सतीश चव्हाण यांनी चहा-पाण्यासाठी राष्ट्रवादीचे वाल्मिक शिरसाठ यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी वाल्मिक शिरसाठ यांचे लहान बंधू शिवसेनेचे डॉ. आबासाहेब सिरसाठ यांनी पत्नी नगरसेविका पल्लवी शिरसाठ यांच्यासह सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण काही तासातच वेगल्याच घडामोडी घडल्या. धक्कादायक! तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक; गुन्हा वाचून तुम्हीही हादराल एकीकडे आबासाहेब सिरसाठ यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे फोटो समोर आले असताना, दुसरीकडे स्वतः सिरसाठ यांनी एका व्हिडिओद्वारे आपण सेनेतच असल्याचा खुलासा करून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या बंधूकडे भेटीसाठी आलेल्या प्रसंगाचा विपर्यास केल्याचे जाहीर करत नाट्यमय घडामोडींवर पडदा टाकला.
दबावामुळे निर्णय बदलला…
यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खुलासा करताना,आबासाहेब सिरसाठ यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तसे फोती व्हिडीओ असून सिरसाठ यांनी स्वतः फोटोसेशन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर दबाव आल्याने त्यांनी प्रवेश केला नसल्याचं म्हटलं असावे, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.