औरंगाबाद : कंपनीच्या नावावर गुतवणूकदारांना दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या औषध व्यावसायिकाला तब्बल तीन वर्षानंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आले. पालघर येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. पंकज फुलझले असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, २०१५ मध्ये पंकज फुलझले याने एका कंपनीची निर्मिती केली. सोबतच वर्कदंत सोसायटी वाडी नागपूर असे नाव असलेली सोसायटी स्थापण केली. या कंपनीत एजंन्ट नेमले. एजेंन्ट मार्फत आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करायला लावली. आमिषाला बळी पडून अनेकांनी कंपनीत गुंतवणूक केली.

‘या’ शहरात पाण्याच्या मोजावे लागणार पैसे ; नळाला अल्ट्रासॉनिक वॉटर मीटर बसवणार
सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांना व्याज दिलं गेलं. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी कंपनी कार्यालयात गुंतवणूकदारांनी गर्दी झाली. दोन कोटींची गुंतवणूक कंपनीत झाली. त्यानंतर मात्र व्याज देणे बंद झाले. गुंतवणूक केलेले पैसे परत देण्यासही कंपनीने नकार दिला. या संदर्भात रामनगर पोलीस स्टेशनला गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल होताच पंकज फुलझले कुटूंबासहीत फरार झाला. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्याचे कार्य स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत होते. तपासात फुलझले हा पालघर येथे असल्याची माहीती मिळाली. माहितीचा आधारावर पोलीस निरीक्षक बोबडे, हवालदार अभय मुर्तरकर यांनी पालघर येथील लक्ष्मी लॉज येथे लपून बसलेल्या पंकज फुलझले यास ताब्यात घेतले. दोन कोटींनी लोकांना लुबाडणार्या पंकज फुलझले यास तब्बल तीन वर्षानंतर अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

धक्कादायक! गतिमंद तरूणीसोबत ५ महिन्यांपासून घडत होतं भयंकर, आईला सांगितली आपबीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here