अमरावती : धरणी तालुक्यातील एका अल्पसंख्याक कुटुंबीयांकडून सुनेच्या अंगावर डिझेल टाकून तीला जिवंतपणीच पेटवून ठार मारण्याचा कट मेळघाटातल्या बैरागड येथून उघडकीस आला असून ९०% जळालेल्या सूनेकडून दिलेल्या बयानानंतर पोलीस दप्तरी तब्बल सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अध्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही .

पोलीसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणी तालुक्यातील बैरागड येथील रहिवासी असलेला पती शेख नासीर वल्द शेख गफूर ( 48 ) याने स्वतः पत्नी हिना ऊर्फ नसीमबानो ( 30 ) हिच्या अंगावर डिझेल टाकून तीला पेटवून ठार मारण्याचा कट रचला. त्यासाठी शेख नासीर यास त्याचा लहान भाऊ सद्दाम, उजेब, जाबीर आणि बहीण अफरोज व इतर एक अश्या पाच जणांनी सहकार्य केल्याचे बयान पीडित नसीमाबानो शेख नासीर हीने पोलीसांकडे दिलं आहे.

आमदार चहा पिण्यासाठी आले अन् सेनेच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीत गेलं, पुढं घडलं भलतंच

गेल्या काही वर्षांपूर्वी हिना ऊर्फ नसीमाबानो हिचे लग्न शेख नासीर वल्द शेख गफूर हयाच्यासोबत मुस्लिम रितीरिवाज पद्धतीतून झाल्यानंतर मुब्बासीर, नवेद, अबूजर, हरशला आणि अक्सा अशी पाच अपत्ये आहेत. तर नासीर हा ड्रायव्हर असून एका खाजगी कंत्राटदाराकडे नोकरी करतो. अलीकडे नासीर यास दारुचे व्यसन जडल्यामूळे तो नियमित दारु डोसून माझ्या मुलीस कुठल्यान कुठल्या कारणांवरून दररोज मारहाण करायचा. त्यानंतर माझ्या मुलीस जीवानिशी ठार मारेल अशी दमदाटी करायचा. या कुटुंबीयांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार व मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा सदर घटनेच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे हिना ऊर्फ नसीमाबानो ही 90% जळाली असून पीएसआय नितीन चुलवार, सुहास डहाके यांच्याकडून फिर्यादींची बयान नोंदवून घेण्यात आले आहे. पती शेख नासीर वल्द शेख गफूर आणि इतर ५ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक; गुन्हा वाचून तुम्हीही हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here