रत्नागिरी: आमच्या महाविकास आघाडीचा कुटुंबकबिला मोठा आहे. ग्रामीण भागात खाटले मोठे आहे, असं म्हटल जातं, त्याप्रमाणे आमचे कुटुंब मोठे आहे. त्यामुळे कुटुंबात लहानमोठ्या कुरबुरी होतात, असे सांगतानाच, रायगड जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सुरू असलेले वाद हे पेल्यातील वादळ आहे, ते निघून जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

नगरपरिषद, जिल्हा परिषद या निवडणुका येतात, त्यावेळी अशा प्रकारचे वातावरण होत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे उभे आहे. ज्या काही कुरबुरी असतील, त्या मिटतील. रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी वाद सुरू आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदलण्याची मागणी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेना आमदारांनी केली आहे. यावर बोलतानाही तटकरे यांनी हे पेल्यातील वादळ निघून जाईल, असे सांगितले. दापोली नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी ते दापोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला; अनिल परब यांचा कुणाला इशारा?
Eknath Shinde : राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी, सुरक्षाव्यवस्था वाढवली

रखडलेल्या बागमंडला पुलाचे काम लवकरच सुरू होणार

कोकणातील सागरी मार्गावरील बागमंडला पुलाचे काम मार्गी लागेल. कोकणातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सागरी महामार्गावरील बाणकोट खाडीजवळील बागमंडला पूल हा आपण अर्थमंत्री असताना मंजूर करून काम सुरू केले. निधीअभावी काम रखडले आहे; मात्र हे काम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खासदार तटकरे यांनी दिली. सागरी महामार्ग डीपीआर तयार झाला आहे. त्यामुळे हे काम लवकरच पुन्हा सुरू होईल, असे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

आपल्या नेत्याच्या छातीत दुखत असताना कार्यकर्ते फटाके का वाजवतात? केसरकरांचा खोचक सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here