जालना : सध्या महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधीपर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे. सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे सध्यातरी राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन सुध्दा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

धक्कादायक! सुनेच्या अंगावर ओतलं डिझेल, कारण वाचून हादराल
रुग्णदुपटीचा कालावधी १,२७३ दिवसांवर

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच केलेल्या या सूचक विधानामुळे राज्यातील जनतेला चांगलाच दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मुंबईत करोना नियंत्रणात येत असतानाच रुग्णदुपटीचा कालावधीही सरासरी १,२७३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईतील करोना बाधितांची संख्याही कमी होत असतानाच रुग्णदुपटीचा कालावधी वाढत चालल्याचा दिलासा मुंबईकरांना मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ओमायक्रॉन संसर्गाने निर्माण केलेली चिंता आता दूर झाली आहे. राज्य सरकार, मुंबई पालिकेने त्यानुसार निर्बंधही शिथिल केले आहेत. मुंबईत मधल्या काही कालावधीत करोनारुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत सरासरी १५० ते २०० दिवसांवर घसरला होता. मात्र, आता परिस्थितीत बदल झाला असून पालिकेच्या शनिवारच्या करोना अहवालानुसार रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी १,२७३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील २४ विभागांपैकी दोन विभागांतील रुग्णदुपटीचा कालावधी दोन हजार दिवसांवर गेला आहे. १८ विभागांतील रुग्णदुपटीचा कालावधी १,०७७ ते १,७७५ दिवसांपर्यंत गेला आहे. तर, उर्वरित चार विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी एक हजार दिवसांपेक्षा कमी नोंदविला गेला आहे.

आमदार चहा पिण्यासाठी आले अन् सेनेच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीत गेलं, पुढं घडलं भलतंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here