अहमदनगर : ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून केली जाणारी उसाची असुरक्षित वाहतूक धोकादायक ठरत आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यात अशाच एका ट्रॉलीला कारची धडक बसून तीन मित्रांचा मृत्यू झाला. आपल्या एका मित्राला काष्टीला सोडवण्यासाठी हे तिघे निघाले होते. श्रीगोंदा ते काष्टी रोडवर झालेल्या या अपघातात तिघेही ठार झाले. जोरदार धडकेमुळे त्यांच्या कारचाही चक्काचूर झाला आहे. (Ahmednagar Accident Latest News)

श्रीगोंदा तालुक्यातील तीन मित्र राहुल सुरेश आळेकर (वय २२, रा श्रीगोंदा), केशव सायकर (वय २२, रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८, रा. श्रीगोंदा) हे या अपघातात ठार झाले. केशव सायकर श्रीगोंद्याला आला होता. त्याला काष्टीला परत सोडवण्यासाठी शनिवारी रात्री हे तिघेही कारने निघाले होते. रस्त्यात उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. अंधारात कारचालकाला त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूने कारची जोराची धडक बसली. यामध्ये तिघांताही मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.

Eknath Shinde : राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी, सुरक्षाव्यवस्था वाढवली

नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या परिसरात उस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून केली जाणारी असुरक्षित वाहतूक धोकादायक ठरत आहे. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत. परिवहन अधिकारी आणि पोलीसही या असुरक्षित आणि बेकायदेशीर वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. दिवसा वाहतुकीला अडथळा ठरणारे हे ट्रॅक्टर रात्रीच्या अंधारात अपघाताचे कारण ठरत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यात अशाच एका अपघातात दौंड येथील रेल्वे सुरक्षा दलातील जवानाचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here