उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील चिंचोली (भु) येथील दांपत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले होते तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान असे ठेवले होते दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा बोरामणी ता. जि. सोलापुर येथे थाटामाटात झाला होता. राष्ट्रपतीचे जन्म दाखला मिळालाय शिवाय आधार कार्ड सुध्दा मिळालाय मात्र पंतप्रधानचा जन्म दाखला लालफितीत अडकलाय का तर पंतप्रधान हे संविधानिक पदनाम आहे म्हणुन जन्म दाखला लालफितीत अडकला.

चिंचोली (भु) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांंची नावे जगावेगळीच ठेवली आहेत या नावामुळे चौधरी दांपत्य चर्चेत आहे होते राष्ट्रपतीचा जन्म १९ जुन २०२० झाला होता राष्ट्रपतीचा जन्म दाखला प्रशासनाने दिला शिवाय आधारकार्ड सुध्दा दिले १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या पंतप्रधानचा जन्म दाखला मिळत नाहिये दत्ता चौधरी यांनी बोरामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जन्म दाखल्याची मागणी केली होती पण पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्यामुळे जन्म दाखला दिला नाही पंतप्रधान हे नाव बालकास दयावे कि नको ?

करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत, निर्बंध कमी करण्याबाबतही म्हणाले…
याबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून सदरील अर्ज सोलापुर येथील जिल्हा निबंधक जन्म- मृत्यु तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवलाय या बाबत अद्यापपर्यंत कुठलेच मार्गदर्शन मिळाले नसल्यामुळे जन्म दाखला लालफितीत अडकला आहे. मात्र, दत्ता चौधरी यांच्या प्राथमिक केंद्राच्या चकरा चालूच आहेत. शेवटी वैतागून दत्ता चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ई-मेल करुन पंतप्रधानचा जन्म दाखला देण्याची मागणी केली आहे.

धक्कादायक! सुनेच्या अंगावर ओतलं डिझेल, कारण वाचून हादराल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here