गाझियाबाद, उत्तर प्रदेश: करोना विषाणूच्या वाढत्या धोक्यासोबतच उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून अतिशय धक्कादायक वृत्त समोर येतंय. इथे ”च्या संशयित कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत केल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत. गाझियाबादच्या एमएमजी रुग्णालयात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी जमातचे कार्यकर्ते गैरव्यवहार करताना दिसत आहेत. कपडे बदलण्यासाठी नर्सेससमोरच हे लोक कपडे उतरवत आहेत, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन त्यांना बरॅकमध्ये बंद करण्याचा विचार करत आहे.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबलीघी जमातशी निगडीत संशयित करोना रुग्ण रुग्णालयातल्या स्टाफसोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. जमातचे काही लोक वारंवार अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. नर्सेससमोरच कपडे बदलणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करत रुग्णालय डोक्यावर घेताना हे लोक दिसत आहेत.

गाझियाबाद जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना तुरुंगात किंवा बरॅकमध्ये टाकण्याचाही विचार सुरू आहे.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी दिल्लीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकणं किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये वादंग निर्माण करणं अशा प्रकारची कृत्य केल्यानं ‘जमात’चे कार्यकर्त्यांवर मोठी टीकाही झाली होती. बिहारमध्ये जमातच्या कार्यकर्त्यांनी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याचंही समोर आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here