ठाणे : ठाणे (Thane) आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कथितरित्या नक्षलवाद्यांकडून पत्राद्वारे धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधातील मोहीमेत काही नक्षलवादी मारले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. आता यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडचिरोली सारख्या ठिकाणी नक्षलवाद कमी करायचा असेल तर, त्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे, हा एकच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी देखील मला अशाच धमक्या आल्या असून, माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी, सुरक्षाव्यवस्था वाढवली
Sunil Tatkare : चहाच्या पेल्यातील वादळ निघून जाईल; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादावर खासदाराची प्रतिक्रिया

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गडचिरोली आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी पत्राद्वारे मिळालेल्या धमकीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला यापूर्वी अशा प्रकारच्या कित्येक धमक्या आल्या, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. मला गडचिरोलीचा विकास करायचा आहे आणि त्या ठिकाणी मी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित भागाचा मी पालकमंत्री आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे. गडचिरोलीमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार मिळणे ही भूमिका शासनाची आहे आणि त्या माध्यमातून तेथे विकास सुरू आहे. त्या ठिकाणी नक्षलवाद कमी करायचा असेल, तर विकास हाच एक पर्याय आहे. आमचं काम आम्ही करणार असल्याची ठाम भूमिकाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

Sanjay Raut : जेवढं भुंकायचं तेवढं भुंका….; संजय राऊत यांचा पलटवार

गडचिरोलीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मी शासनाच्या माध्यमातून करणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूरपासून गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली असा नेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद्यांच्या धमक्या पूर्वी देखील आल्या आहेत. तसेच धमक्या येत असताना सुरक्षेच्या बाबतीत गृह विभाग बघेल, असं राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गृहराज्य मंत्र्यांनी ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, तरी सुरक्षेत वाढ करावी, असे म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here