याप्रकरणी दंगल, बेकायदा रॅली, तोडफोड, जाळपोळ, पोलिसांवर हल्ला, लुटमार आदी कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात तीन तर आयशानगर पोलीस ठाण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल झाले होते. घटनेच्या तीन महिन्यांत आरोपपत्र दाखल करणे अनिवार्य असल्याने पोलिसांनी न्यायाधीश आनंद देशमुख व निमसे यांच्याकडे चार गुन्ह्यांचे आरोपपत्र सादर केलं आहे. सोमवारी संशयित आरोपींना आरोपपत्राच्या प्रती दिल्या जाणार आहेत. चौकशीत पाच जणांचा सहभाग आढळून न आल्याने १६९ नुसार त्यांची नावे वगळली आहे. यासंदर्भात सोमवारी नियमित सुनावणी होऊन त्यांच्या सुटकेचे आदेश होण्याची शक्यता आहे.
मुख्य संशयित फरार
आरोपपत्र दाखल झाले तरी मुख्य संशयित अद्याप फरार आहेत. रजा अकादमीचे अध्यक्ष डॉ. रईस रिजवी, सुन्नी जमियतचे युसूफ इलियास यांचा फरार संशयितांमध्ये समावेश आहे.
९ गुन्हे दाखल
दंगल व आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ९ गुन्हे दाखल आहेत. दंगलीच्या गुन्ह्यांत ५० पेक्षा अधिक संशयितांना अटक आहे. यातील एकाही संशयिताचा जामीन झालेला नाही. आक्षेपार्ह व्हिडिओच्या गुन्ह्यात चौघांना जामीन मिळाला आहे.