जळगाव : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही महिन्यांपासून संप सुरू आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची विनंती केली आहे. मात्र कामावर रुजू होणार्‍या कर्मचार्‍यांना संपकरी कर्मचारी चिथावत असल्याचा प्रकार सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (St Bus Strike In Maharashtra)

एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन अनेक महिन्यांपासून खोळंबलेली बससेवा काही प्रमाणात पूर्ववत झाली आहे. यातच आता कामावर हजर होणाऱ्या बस कर्मचाऱ्यांना संपकरी कर्मचारी चिथावत असल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे नवीन वाद उभा राहिला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जळगाव आगारात संपकरी कर्मचार्‍यांसोबत बैठक घेतली.

Jitendra Awhad: ‘या देशात कुत्र्यामांजरांची गणना होते, ओबीसींची का नाही?’; जितेंद्र आव्हाड कडाडले

शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, आपसात वाद करू नये किंवा कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्याची चिथाऊ नये, असं आवाहन या बैठकीप्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले. तसंच अशा पद्धतीने कोणी कामावर हजर होणार्‍या कर्मचाऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाकोडे यांनी दिला आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक इशारानंतर संपकरी कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here