वृत्तसंस्था, बर्लिन :

रशिया-युक्रेनमधील तणाव दूर करण्यासाठी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्झ या आठवड्यात युक्रेन आणि रशियाला भेट देणार आहेत. पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर संस्थांनी रशिया युक्रेवर कधीही हल्ला करू शकते, असा इशारा दिल्यानंतर जर्मनीने युक्रेनमधील जर्मन नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्यास सांगितले आहे.

चॅन्सेलर म्हणून ओलाफ यांचा युक्रेन आणि रशियाचा पहिलाच दौरा असेल. सोमवारी युक्रेन, तर मंगळवारी रशियाला ते रवाना होतील. दोन्ही देशांच्या अध्यक्षांशी ते संवाद साधतील. युक्रेनवर आक्रमण महागात पडेल, असा नव्याने इशारा त्यांनी दिला. ‘युरोपमध्ये युद्ध होऊ नये, ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लष्करी आक्रमणाचे परिणाम रशियासाठी गंभीर असतील. या समस्येवर आम्ही मित्रदेश एकत्र आहोत,’ असे विधान त्यांनी जर्मनीच्या संसदेत नुकतेच केले होते. ‘सर्व प्रकारचे राजनैतिक मार्ग खुले असतील,’ असेही ते म्हणाले होते.

Snake On Flight: विमान हवेत असताना प्रवाशांना ‘केबिन लाईट’मध्ये दिसला साप आणि मग…
Russia Ukraine Crisis: बीजिंग ऑलिम्पिक संपण्यापूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला, अमेरिकेचा इशारा
रशियाने एक लाखाहून अधिक फौज युक्रेनच्या सीमेवर आणली आहे; मात्र आमचा आक्रमणाचा हेतू नसल्याचे रशियाने म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर संस्थांनी मात्र रशिया युक्रेनवर केव्हाही हल्ला करील, असा इशारा दिला आहे. युक्रेन आणि इतर सोव्हिएत रशियामध्ये एके काळी असलेल्या देशांना ‘नाटो’ने सदस्य म्हणून मान्यता देऊ नये, अशी मागणी रशियाने केली आहे; तसेच पूर्व युरोपातून युक्रेनमध्ये शस्त्रे आणि फौजा तैनात करू नयेत, असेही रशियाने म्हटले आहे. अमेरिका आणि ‘नाटो’ देशांनी रशियाची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

NMC ची सूचना; चिनी विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्याआधी…
‘जेम्स वेब टेलिस्कोप’चा करिश्मा; कोणत्याही कॅमेऱ्याशिवाय पहिला ‘सेल्फी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here