मुंबई: करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात हळूहळू ओसरताना दिसतेय. करोना विषाणूच्या अन्य व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन (Omicron) चा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून आला. या लाटेत राज्यात १३ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला. त्यातील पाच टक्के म्हणजेच ६५ हजार लोक असे आहेत, की ज्यांना पुन्हा करोनाचा संसर्ग झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. जानेवारीत सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती घेतली असता, ६ हजार रुग्णांपैकी जवळपास अडीच हजारांहून अधिक रुग्णांना ‘ब्रेक-थ्रू इन्फेक्शन’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, ८ डिसेंबर ते फेब्रुवारीत म्हणजेच आतापर्यंत १३ लाखांहून अधिक रुग्ण करोनाबाधित झाले आहेत. तर, जानेवारीत रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. केवळ ९९ रुग्णांनाच पुन्हा करोना संसर्ग झाला आहे. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या माहितीनुसार, काही डॉक्टर, परिचारिका यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी संपूर्ण लसीकरण होऊनही बाधित, तसेच काहींना पुन्हा करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे यावेळी रुग्णांवर उपचार करताना सुरुवातीच्या काळात डॉक्टरांची कमतरता जाणवली.

women health drink ने द्या शरीर ठेवा सुदृढ, रहा आरोग्यदायी
मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा; आठवडाभरात निर्बंधमुक्ती?

सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी

‘नवभारत टाइम्स ऑनलाइन’च्या वृत्तानुसार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, यावेळी सरकारी रुग्णालयांमध्ये खूप कमी संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. तर काही रुग्ण घरीच उपचार करून करोनामुक्त झाले. दाखल रुग्णांची संख्या अधिक असती तर, पुन्हा संसर्ग झालेले आणि ब्रेक-थ्रू इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची नेमकी अशी आकडेवारी मिळू शकली असती.

coronavirus update: मोठी बातमी! राज्यात करोना उतरणीला; आज ३ हजारांवर नवे रुग्ण, १७ मृत्यू

श्वास घेण्याच्या त्रासामुळे ४५ टक्के मृत्यू

करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्यासारखी सौम्य लक्षणे आढळून आली होती. मात्र, गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या एकूण मृत्युंपैकी ४५ टक्के मृत्यू हे श्वास घेण्याच्या त्रासामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डेथ ऑडिट कमिटीने ही बाब स्पष्ट केली आहे. मात्र, हे मृत्यू करोनाच्या कोणत्या व्हेरियंट अर्थात डेल्टा किंवा ओमिक्रॉनने झाले आहेत का, याबाबतचा अभ्यास करण्यात येत आहे.

coronavirus update: चांगली बातमी! मुंबईत करोनाचा आलेख आला खाली; पाहा, ताजी स्थिती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here