व्हॉटसअपच्या साहाय्यानं मदत
दरम्यान, दिल्ली सरकारनं करोना धोक्याच्या पार्श्वभमीवर लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्याच्या हेतूने व्हॉटसअपवर एक विशेष हेल्पलाईन सुरू केलीय. +९१ ८८००० ०७७२२ या क्रमांकावर व्हॉटसअपद्वारे तुम्हाला माहिती मिळू शकेल. ही सेवा मोफत असेल, असंही दिल्ली सरकारनं म्हटलंय.
‘सीएपीएफ’च्या १०० तुकड्या तैनात
कोविड १९ धोक्याच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) १०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमध्ये जवळपास १०,००० जवान तैनात आहेत.
दिल्लीतील सात डॉक्टरांना करोनाची लागण
देशातील सर्वांत मोठ्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) फिजिओलॉजी विभागातील एका निवासी डॉक्टरलाही गुरुवारी ‘करोना’ची लागण झाली. या डॉक्टरला सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या सर्व चाचण्या करण्यात येत आहेत. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी होणार आहे. राजधानी दिल्लीत आतापर्यंत सफदरजंग रुग्णालयातील दोन सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय, दिल्ली राज्य कर्करोग संस्थेतील प्रत्येकी एक तसेच मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर दांपत्य अशा सात जणांना ‘करोना’ची लागण झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times