मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे हे आमरण उपोषण करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात ते उपोषणाला बसणार आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसणार आहेत.

मराठा समाज आरक्षणावरून आता संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून, त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानात ते २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. ते एकटेच उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला, गरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हे आंदोलन करत आहे, असे ते म्हणाले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Congress agitation: काँग्रेसचा एकांडा शिलेदार! अतुल लोंढे सागर बंगल्याच्या परिसरात एकटेच शिरले अन्..
भाजपमधील ‘साडेतीन’ लोकं लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील; संजय राऊत यांचा सूचक इशारा

काय म्हणाले संभाजीराजे?

मराठा समाजातील गरीब लोकांना मी न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करत आहे. ५ मे २०२१ रोजी मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाले. त्यानंतर मी सर्व घटकांना एकत्र घेऊन समाजासमोर गेलो. आपलं आरक्षण कसे रद्द झाले? आपण कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे? हे समजून सांगण्यासाठी मी राज्यातील प्रत्येक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दारात गेलो. हात जोडून त्यांना विनंत्या केल्या. माझी भूमिका मांडली, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

नौटंकीबाज नाना पटोलेंची माझ्या घराबाहेर आंदोलन करण्याची काय हिंमत; फडणवीसांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

मराठा समाजातील नागरिकांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना याबाबत सांगत आलोय. माझी भूमिका वेळोवेळी मी त्यांच्यासमोर मांडली आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर मी पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगितले होते. ती दाखल केल्यानंतर सध्या त्याबाबत काय स्टेट्स आहे, हे माहिती नाही. याबाबत भोसले समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजाचे जोपर्यंत सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावं, अशी भूमिकाही छत्रपतींनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here