इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष पीटीआयचे खासदार आणि लोकप्रिय टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसेन आपल्या तिसऱ्या विवाहानंतर चांगलेच चर्चेत आलेत. ४९ व्या वर्षी लियाकत यांनी १८ वर्षीय सईदा दानिया शाह यांच्यासोबत तिसरा विवाह केलाय. नुकताच, लियाकत यांनी आपल्या पत्नीसोबत एका स्थानिक टीव्ही चॅनलला एक मुलाखत दिलीय. यामध्ये आपल्या तिसऱ्या पत्नीनं आपल्याला चौथ्या विवाहाची परवानगी आधीच देऊन टाकल्याचं वक्तव्य लियाकत यांनी केलंय.

मुलाखती दरम्यान, ‘दानिया यांच्याशी पहिल्यांदा कशी भेट झाली?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, ‘आमची पहिली भेट केवळ २८ मिनिटांची होती. त्याअगोदर आमच्यात कधीही भेट किंवा बोलणं झालं नव्हतं. मी मिलादच्या एका कार्यक्रमासाठी लोधराला गेलो होतो. एका मोठ्या कुटुंबानं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. इथून मी पाकिस्तानचे व्यावसायिक आणि पीटीआय नेते जहाँगीर तरीन यांना फोनदेखील केला होता आणि त्यांनी मला आपल्या फार्महाऊसवर बोलावलं’ अशी आठवण लियाकत यांनी सांगितली.

मिलादच्या कार्यक्रमानंतर आम्ही लोधरनच्या पीरच्या घरात गेलो. मी त्यांना ओळखत होतो. काही खासगी विषयांवर मी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं, अशा मुलीशी तुमचा विवाह करून देतो की तुम्हाला काही पाहावंच लागणार नाही… आणि मग मी ज्या मुलीला भेटलो ती दानिया होती. या भेटीत मला यांच्यासंबंधी एक वेगळीच गोष्ट माहीत पडली. या लहानपणी रडत असत तेव्हा त्यांना ‘आलिम ऑनलाईन’ (लियाकत यांचा प्रसिद्ध कार्यक्रम) दाखवून त्यांचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला जात असे, असं म्हणत आपल्या दोघांच्या वयातील अंतरावर लियाकत यांनी भाष्य केलं.

पाकिस्तानात रहस्यमय बुशरा बीबी आणि इम्रान खान यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा
Pakistan: पंतप्रधानांच्या पावलावर खासदाराचं पाऊल; ४९ व्या वर्षी १८ वर्षांच्या तरुणीशी तिसरा विवाह
तर, लियाकत यांच्या भेटीविषयी सांगताना दानिया म्हणाल्या, ‘हे माझ्या खरोखरच समोर आहेत याची मला खात्री वाटत नव्हती. मी थोड्यावेळ गोंधळून गेले होते. मला हे सगळं खोटं वाटत होतं. आपण लहानपणापासून ज्याच्यासाठी वेडे असतो ती व्यक्ती अचनाक आपल्यासमोर आली तर आपल्याला कसं वाटेल?’

या दाम्पत्याच्या विवाहाच्या चर्चांविषयी प्रश्न विचारला असता, ‘लोकांच्या चर्चांवर आम्ही लक्ष देत नाही. मी आमिर जे म्हणतात, ते ऐकते आणि मान्य करते’ असं दानिया म्हणत असतानाच आमिर यांनी आपल्या पत्नीला रोखत म्हटलं ‘जी मुलगी म्हणतेय की विवाहानंतर मला तुम्ही मिळालात, आता तुम्ही काहीही करा, विवाहही केलात तरी मला काहीही फरक पडणार नाही’ असं म्हणत एकच हास्यकल्लोळ पिकवला.

यावर, ‘हो मी यांना आणखी एक विवाह करायचा असेल तर तोही करू शकता असं म्हटलं. मी त्यांना चौथ्या विवाहाची परवानगी दिली कारण हा माझा हक्क नाही की मी त्यांना रोखू शकेल. त्यांची स्वत:ची मर्जी… त्यांनी विवाह करावा किंवा करू नये. मी त्यांना प्रेम दिलं तर ते माझ्यासोबत राहतील. नाही दिलं तर ते दुसरा विवाह करतील’ असं वक्तव्य दानिया यांनी केलं.

उल्लेखनीय म्हणजे, आमिर लियाकत यांनी आपली दुसरी पत्नी आणि पाकिस्तानी अभिनेत्री टुबा आमिर यांच्यासोबतच्या आपल्या घटस्फोटाचा सोशल मीडियावरून खुलासा केला त्यानंतर केवळ २४ तासांत दानिया यांच्यासोबत तिसरा विवाह केला.

Russia Ukraine Crisis: जर्मनीचे चॅन्सेलर देणार युक्रेन-रशियाला भेट
NMC ची सूचना; चिनी विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्याआधी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here