नाशिकच्या देवळा तालुक्यात प्रेमप्रकरणातून एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणाला जाळून मारणाऱ्या मुलीच्या कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

Deola-Police-Station

देवळा पोलीस ठाणे

महेश महाले । नाशिक

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र एका प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या या प्रकरणात एका प्रियकराला आपला जीव गमवावा लागला असून त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रेयसीला खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात जावं लागलं आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव (वय ३१) युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीशी गोरखचे तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्यानं त्यांच्यात ब्रेकअप झाला. ब्रेकअप नंतर गोरखने कल्याणी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र कल्याणीच्या कुटुंबीयांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. गोरखला ही बाब खटकली आणि त्याने कल्याणीचं लग्न जिथं जमेल, तिथं काहीतरी सांगून लग्नात मोडता घालण्याचे प्रयत्न सुरू केले. याच रागातून कल्याणी सोनवणे या युवतीचे आई-वडील व भाऊ यांनी देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरख बच्छाव या तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलं. यात गोरख बच्छाव हा तरुण ८० टक्के भाजला होता. आज या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणेसह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nashik: five held for murder of a youth in deola
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here