कुडाळ नगरपंचायतीच्या एकूण १७ पैकी ८ जागांवर भाजप ,७ जागांवर शिवसेना आणि २ जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर भाजप काँग्रेसशी तात्पुरता समझोता करुन येथील सत्ता राखणार, अशीही चर्चा सुरु होती. त्यामुळे कुडाळमध्ये कोणाचा नगराध्यक्ष बसणार याबद्दल होती सर्वांना उत्सुकता होती.

 

Kudal Nagarpancyat Election 11

कुडाळ नगरपंचायत

हायलाइट्स:

  • या निवडणुकीपूर्वी कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला
  • भाजप काँग्रेसशी तात्पुरता समझोता करुन येथील सत्ता राखणार, अशीही चर्चा सुरु होती
सिंधुदुर्ग: गेल्या अनेक वर्षांपासून राणेंचे वर्चस्व असलेल्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे धक्का बसला आहे. याठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी अनुक्रमे काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना ९ मते तर भाजपच्या (BJP) प्राजक्ता बांदेकर यांना ८ मते पडली.अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाचा नगराध्यक्ष बनला आहे. तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे (Shivsena) मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या एकूण १७ पैकी ८ जागांवर भाजप ,७ जागांवर शिवसेना आणि २ जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर भाजप काँग्रेसशी तात्पुरता समझोता करुन येथील सत्ता राखणार, अशीही चर्चा सुरु होती. त्यामुळे कुडाळमध्ये कोणाचा नगराध्यक्ष बसणार याबद्दल होती सर्वांना उत्सुकता होती. मात्र, चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकासआघाडीने कुडाळ नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी आपले उमेदवार निवडून आणले.
Sindhudurg: कोकणात जोरदार राडा; कुडाळमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
या निवडणुकीपूर्वी कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळ नगरपंचायत येथील इमारतीच्या जवळ आले. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : kudal nagar panchayat mayor election congress afrin karol and shivsena mandar shirshat win against bjp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here