कोलंबो, श्रीलंका :

श्रीलंकन नौदलाकडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आलीय. गेल्या काही भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंधांमध्ये मच्छिमारांचा मुद्दा अडसर ठरतोय. आपल्या हद्दीतील पाण्यात बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याच्या आरोपाखाली या भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या दोन नौकाही जप्त करण्यात आल्यात. रविवारी यासंबंधी अधिकृत निवेदनातून ही माहिती देण्यात आली.

श्रीलंकन नौदलानं दिलेल्या माहितीनुसार, तलाईमन्नारच्या उत्तरेकडील समुद्रात ही कारवाई करण्यात आली. भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या हद्दीतील समुद्रात जाळे टाकून मासेमारी करत होते. हे ध्यानात आल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान श्रीलंकन नौदलानं दोन भारतीय मासेमारी नौकाही जप्त केल्या आहेत.

रशियाकडून युक्रेनवर हल्ल्याचा धोका; अमेरिकेकडून ब्रिटनमध्ये बॉम्बर्स तैनात
Russia Ukraine Crisis: जर्मनीचे चॅन्सेलर देणार युक्रेन-रशियाला भेट

महिन्यातील तिसरी कारवाई

उल्लेखनीय म्हणजे, श्रीलंकन नौदलानं सद्य महिन्यात तिसर्‍यांदा आपल्या जलक्षेत्रात भारतीय मच्छिमारांना अटक केलीय. यापूर्वी, ८ फेब्रुवारी रोजी नौदलानं ११ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या पाण्यात मासेमारी केल्याप्रकरणी अटक केली होती तसंच त्यांच्या तीन मासेमारी नौकाही जप्त केल्या होत्या. त्यापूर्वी श्रीलंकन नौदलानं फेब्रुवारी रोजी २१ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंधांमध्ये मच्छिमारांचा मुद्दा अडसर ठरतोय. श्रीलंकेच्या नौदलानं पाल्क सामुद्रधुनीत भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केल्याच्या आणि त्यांच्या बोटी जप्त केल्याच्या अनेक कथित घटना समोर आल्या आहेत. पाल्क सामुद्रधुनी ही श्रीलंका आणि तामिळनाडूमधील पाण्याची एक अरुंद पट्टी आहे. या भागात मुबलक प्रमाणात मासे आढळतात त्यामुळे दोन्ही देशांतील मच्छीमार इथं मासेमारीसाठी दाखल होतात.

पाकिस्तानी खासदाराला तिसऱ्या पत्नीकडून चौथ्या विवाहाची परवानगी
पाकिस्तानात रहस्यमय बुशरा बीबी आणि इम्रान खान यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here