कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक होत आहे. (KDMC election 2022) प्रभाग रचनेच्या घोळावरून कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ता आली तर, सूर्य कूठूनही उगवू शकतो अशी मला खात्री वाटते, असा टोला आमदार गायकवाड यांनी शिवसेनेला लगावला आहे. गायकवाड यांनी आठ पॅनलमध्ये चुकीच्या पद्धतीने रचना केली गेली असल्याचे सांगत हरकत घेतली आहे. उल्हासनगरातील काही भाग केडीएमसीत समाविष्ट करण्यात आला आहे, असे आमदार गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. पालिका क्षेत्रात एकूण ४४ पॅनल आणि १३३ प्रभाग आहेत. निवडणूक आयोगाने हरकती सूचनांसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्याचा आजचा शेवटचा दिवस होता. कल्याण पूर्व विभागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी आज महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात येऊन प्रभाग रचनेसंदर्भात हरकती घेतल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसनेला लक्ष्य केलं आहे. आमदार गायकवाड म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीच्या प्रभाग रचनेत इतका घोळ झालाय की, उल्हासनगर महापालिकेचा काही भाग सुद्धा केडीएमसीच्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. आपल्याला जास्त मतदान कसं होईल, अशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना केली आहे. प्रभाग रचना कुठून होणार, याची दिशा सुद्धा बदलण्यात आली. टिटवाळापासून सुरू होणारा प्रभाग थेट उंबर्डेपासून सुरू केला आहे. म्हणजेच सत्ता असली तर, सूर्य कुठून पण उगवू शकतो, असा टोला भाजप आमदार गायकवाड यांनी लगावला.

अनधिकृत दुचाकी टॅक्सीला रिक्षाचालकांचा विरोध
काळ्या यादीतील कंपनीला रुग्णालयांची कंत्राटे

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, ‘कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रभागरचना बघता, सर्व चुकीचे केले आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. सत्तेचा गैरवापर करून प्रभाग रचना केली आहे. निवडणूक आयोगाचा जीआर असताना सुद्धा, २०१५ आणि २०१९ मधील निवडणुका लक्षात घेऊन, कुठल्या प्रभागात आपल्याला मतदान झाले आहे, हे बघूनच ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही आक्षेप नोंदवला आहे. काही ठिकाणी तर वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या मतदारांचीच नावे नसल्याचे दिसून येत आहे. असे करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या बाबी लक्षात आणून दिल्या जाणार आहेत.’

माझे वडील अरुण गवळीच्या वडिलांच्या अड्ड्यावर पैसे मोजण्याचं काम करायचे: जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here