सांगली : अवकाळी पाऊस आणि थंडीच्या लांबलेल्या मुक्कामानंतरही यंदा आंबा सुमारे १५ दिवस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. हापूस आणि पायरी आंब्याच्या १६ पेट्या आज सांगलीतील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये दाखल झाल्या. पहिल्याच दिवशी आंब्याच्या एक डझन पेटीला पंधराशे रुपयांचा दर मिळाला. अवकाळी पावसानंतरही यंदा कोकणात आंब्याचे उत्पादन पुष्कळ प्रमाणात असल्यामुळे यंदा खवैय्यांना चांगल्या प्रतीचा आंबा खायला मिळण्याची शक्यता आहे. (Sangali News Update)

दरवर्षी आंबा शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सांगलीच्या बाजारपेठेत पोहोचतो. पण यावर्षी १५ दिवस लवकरच आंब्याची आवक सुरू झाली आहे. सांगलीच्या विष्णूअण्णा फळ मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडे देवगड हापूस आणि पायरी आंब्याच्या १६ पेट्या आज दाखल झाल्या आहेत. सांगलीत आज आंब्याला एक डझनच्या पेटीला पंधराशे रुपयांचा दर मिळाला.

किमान महाराष्ट्रात तरी लोकशाही येईल; अण्णा हजारेंचं मोठं विधान

दरम्यान, गतवर्षी पडलेला अवकाळी पाऊस आणि करोनाचा फटका आंब्यालाही बसला आहे. लवकर बहरलेला आंबा अवकाळीमुळे खराब झाला, तर अवकाळीनंतरच्या बहराचा आंबा चांगला असल्याचे कोकणातील शेतकरी आणि व्यापारी सांगतात. यंदा लवकरच हापूस आंब्याचे आगमन झाल्याने दरही चांगला मिळेल, अशी आशा फळ विक्रेते व्यापाऱ्यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here