रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील ६६ वर्षीय व्यक्तीने आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जवळपास दोन वर्षांपासून ते आजारी होती. याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना रविवारी, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा सोनू सावंत (वय ६६, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

कृष्णा सावंत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सावंत यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

मुंबईहून गावी लग्नासाठी आलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू
nmmt bus caught fire: बॅटरीने पेट घेतला, बघता बघता एनएमएमटीची बस जुळून खाक

पोलिसांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, कृष्णा सावंत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेची माहिती त्यांचा मुलगा श्रीपाद कृष्णा सावंत (वय ४१, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. कृष्णा सावंत हे मागील २ वर्षांपासून आजारी होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी रविवारी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्लॅबच्या हुकला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. दरम्यान, या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.

Pune Crime : इंजिनीअर मुलानं आधी आईचा खून केला, नंतर स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here